Press "Enter" to skip to content

पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे टॉयकॅथॉनच्या स्पर्धेचे आयोजन

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेल येथीलपिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे 22 ते 24 जून दरम्यान टॉयकॅथॉन (खेळणी स्पर्धा) अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. यात एकूण 14 संघांनी डिजीटल स्वरूपात सहभाग घेतला आहे.
             

डिजीटल टॉयकॅथॉनच्याअंतिम फेरीचे उद्घाटन शिक्षण मंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांच्या हस्ते 22 जून 2021 रोजी होणार आहे. विविध मंत्रालयाच्या अंतर्गत एकत्रित उपक्रम म्हणून  डिजीटल  टॉयकॅथॉनची अंतिम फेरी22 ते 24 जूनदरम्यान पार पडेल. भारतातील खेळणी बनविणाऱ्या उद्योगात नाविण्याला प्रोत्साहन देणे हा त्या मागचा उद्देश आहे. मेक इन इंडिया टॉईज या उपक्रमाला विद्यार्थी तसेच उद्योजक, तज्ञ यांच्या डिजीटल टॉयकॅथॉनमधील सहभागातून या क्षेत्रातील नवीन कल्पकतेला उत्तेजन मिळणार आहे.

भारतातील खेळणी उद्योगाला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एज्यूकेशन अंतर्गत इन्होवेशन सेल (एमआयसी) व ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्यूकेशन (एआय़सीटीई) तर्फे टॉयकॅथॉन 2021च्या अंतिम फेरीच्या आयोजनासाठी नवीन पनवेल येथील पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची निवड कऱण्यात आली आहे. भारताच्या विविध भागातून एकंदर 14 संघांनी सहभाग या स्पर्धेत नक्की केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकलच्या आवाहनाला खेळणी उद्योगातून प्रतिसाद म्हणून शिक्षण मंत्रालयाने देशभर विविध स्तरांवर टॉयकॅथॉन आयोजिक केले. यात इतर मंत्रालयांचाही सहभाग आहे.

शिक्षण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी या संदर्भात असे प्रतिपादन केले की, यामुळे तरूण विद्यार्थी देशातील विविध संस्था, इस्रो, डिआरडिओ, डिई अनेक आयआयटी, आयआयएससी, अनेक आयसर, एनआयटी, आयआयआयटी आणि पूरातन व आधुनिक शास्त्राशी जोडले जातील असा उपक्रम या देशात बनविण्याचा खेळण्याचे देशाच्या सांस्कृतिक वारश्याशी घट्ट नाते असले पाहिजे. ज्यायोगे तरूण मुलांमध्ये अभिमानाची भावना तयार होईल आणि त्यांच्यात शिक्षणाची रूची निर्माण होईल. एआयसीडीईचे अध्यक्ष प्रो. अनिल सहस्रबुद्धे याबाबत म्हणाले की, राष्ट्रीय शैैक्षणिक धोरण 2020च्या माध्यमातून मुलांच्या सुरवातीच्या वयापासूनच्या शिक्षण शिकण्यावर असा भर देण्यात आला आहे की, स्वतः काही गोष्टी करून बघून त्यातून शिकणे, खेळातून शिकणे त्यामुळे विविध कौशल्याची सर्वकश अशी वाढ होते.

विचारात मुद्देसुरपणा येतो. मनाचा वैज्ञानिक आणि नाविण्याचा कल तयार होतो. योग्य वयाला साजेशी अशी खेळणी तयार केली गेली तर हे सहज शक्य आहे. ज्यायोगे आयक्यू, ईक्यू व एसक्यू निर्माण होईल. या संधीचा आत्ताच योग्य फायदा करून घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.