Press "Enter" to skip to content

खांब देवकान्हे मार्गावरील खड्डे जीव घेण्याच्या प्रतीक्षेत

खड्डे बुजविण्यासाठी वाली कोण ? जीव गेल्यावर खड्डे भरले जातील का ? नागरिकांचा संतप्त सवाल !

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )

मुंबई गोवा महामार्गालगत जोड़ला गेलेला उप रस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड तसेच हा मार्ग अनेक गावांना जोड़ला गेला असून या मार्गावरुन सातत्याने वहानांची वर्दल तसेच रहदारिचा मार्ग म्हणून सर्वांनाच सुप्रसिद्धआहे या मार्गालगत अनेक गावे वसलेली आहेत येथील नागरिकांना याच मार्गावरून रात्रंदिवस प्रवास करावा लागत असून मोठ मोठे जिव घेणे खड्डे गेली अनेक वर्षांपासून पडले असून या मार्गावरील वळणे देखील धोकादायक ठरतात तसेच खांब धानकान्हे देवकान्हे मार्गावर व पालदाड पुलावर मोठं मोठे खड्डे पडल्याने रहदारी करत असलेल्या वहान चालकांसह प्रवाश्यांना काहीसा अंदाज अरुंद रस्त्याचा व या पडलेल्या खड्यांचा तसेच वळणांचा येत नसल्याने या ठिकाणी अनेक छोटे मोठे आपघात घडत आहेत तर पडलेले खड्डे हे जणू जीव घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत खड्डे भरण्यास कोणी वाली आहे का अथवा जीव गेल्यानंतर हे खड्डे भरले जातील का असा संतप्त सवाल येथील प्रवासी नागरिक व या मार्गा लगतचे संबधित ग्रामस्थ करत आहेत.

गेली अनेक वर्षे खांब देवकान्हे पालदाड या मार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे मात्र निडी तर्फे धानकान्हे या मार्गाचे काम मागील दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत रस्ता तयार करण्यात आले मात्र ते अर्धवट सोडून दिले ते केवळ निडी पेपरमिळ ते देवकान्हे इथपर्यंतच केले धानकान्हे गावापर्यंत पोहचलेच नाही तर खांब देवकान्हे या मार्गाच्या कामांची अनेकदा दुरुस्ती करत ते चिल्हे या गावापर्यंतच करण्यात आले मात्र चिल्हे धानकान्हे देवकान्हे या मधल्या दोन ते तीन किलोमीटर अंतर असलेल्या यामार्गाचे काम करण्यास कित्येक वर्षे टाळाटाळ केली जात आहे तसेच कामासाठी वाली कोण असा संतप्त सवाल केला जात आहेत गेली अनेक वर्षे येथील नागरिकांचा प्रवास हा खड्यातून होत असल्याने अनेकदा आपघात होऊन काहींना अपंगत्व आले असून दररोज किरकोळ अपघातांची मालिका सुरूच आहे तर अरुंद रस्ता असल्याने दोन वाहने जा ये करू शकत नाहीत तसेच साईड पट्टी देखील शेतकऱ्यांच्या कुपणाने खाल्ली आहे त्यामुळे तुर्तास या खड्डयांच्या दुरुस्तीसाठी कोणी वाली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागातील सडक योजना गेल्या कुठे ?

ग्रामीण भागासाठी केंद्र सरकार सह राज्यसरकरच्या माध्यमातून अनेक सडक योजनेवर उपाय योजना तयार करण्यात येतात मात्र त्या सर्व प्रकारच्या योजना या मार्गाच्या कामासाठी कूच कामी ठरत आहेत का ? कोण म्हणतो माझा बालेकिल्ला आहे हा विभाग आमच्या विकास कामांवर विश्वास ठेवणारा आहे या विभागातूनच आम्ही राजकारणात यशस्वी ठरलो आहोत त्याच बरोबर गावच्या सर्वांगिक विकासासाठी आहोत मात्र गेली अनेक वर्षांपासून अरुंद रस्त्याचे रुंदीकर करावे अशी मागणी अनेकदा केली मात्र हा रस्ता का होत नाही त्यामुळे नागरिकांचा खड्डेमय प्रवास नागरिकांच्या जीवावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहेत जीव धोक्यात घालून या मार्गावरून खांब,नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे,देवकान्हे,बाहे, येथील बहुतांश धाटाव एम आय डी सी मध्ये रोजी रोटीसाठी जाणारा कामगार वर्ग व काही बाजार खरेदी करण्यासाठी खांब कोलाड या ठिकाणी जा ये करीत असतात त्यामुळे त्यांना जीवाची बाजी लावून प्रवास करावा लागत आहे,त्यामुळे खड्डे बुजवण्यास कोणी वाली आहे का ? असा संतप्त सवाल डोळ्यासमोर उभा राहिला आहे,

नेत्यांच्या आश्वासनांची खैरात गेली कुठे ?

नेत्यांच्या निवडणुका आल्या की सऱ्यांच्याच गाड्या कार्यकर्यांच्या गावाकडेधावतात आणि त्यांच्या समवेत गावच्या सर्वांगिक विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत कार्यकर्त्यांना दिलेले आश्वासन गेली कुठे तसेच पराभूत झाले ते गेले जिंकून आले कोणी आमदार झाले कोणी खासदार झाले कोणी मंत्री झाले परंतु नागरिकांच्या हिताच्या सुविधेकडे यांची पाठ फिरत असल्याचे दिसून येत आहे,

तरी सदरच्या मार्गावरील संबधित अधिकारी वर्गाने याची पाहणी करून तात्पुरता खड्डे भरून त्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील प्रवाशी ग्रामस्थ करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.