तळा उपविभातील म्हसाडी, कुंबेट, वांजोळशी सह अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्ववत
सिटी बेल लाइव्ह / रायगड / संजय कदम #
3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड येथे महावितरणच्या यंत्रणचे मोठे नुकसान होऊन अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून अनेक गावे प्रकाशमान केली आहे. तसेच, चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झालेल्या तळा उपविभातील म्हसाडी, कुंबेट, वांजोळशी सह दहिवली, बोरीचा माळ, माझगाव, ताम्हाणे, फळशेत कर्नाळा गावांचा वीजपुरवठा सुरु करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे.
भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता सौ.पुष्पा चव्हाण यांनी तळा येथे भेट देऊन पाहणी केली तसेच उर्वरित गावांचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले आहे.
पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा विभागाचे कार्यकारी अभियंता उमाकांत बिरादार व विशेष प्रतिनियुक्तीवर आलेले कार्यकारी अभियंता, ठाणे नितीन थिटे यांनी कामाचे सुक्ष्म नियोजन करून कामाला सुरुवात केली. याकामी अति.कार्यकारी अभियंता अहमद, अति कार्यकारी अभियंता मस्के, उपकार्यकारी अभियंता, बकुल मनवटकर व सहाय्यक अभियंता विशाल पानसरे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
तळा तालुक्यातील अनेक भाग घनदाट जंगलातून जात असल्यामुळे काम करून 48 उच्चदाब खांब, 112 लघुदाब खांब, 2 वितरण रोहित्रांची उभारणी करण्याचे काम महावितरणने पूर्ण केले आहे. याकामात, कंत्राटदार मे.आराध्या इलेकट्रीकल्स, मे.ओम नमो साई इलेकट्रीकल्स, मे. एकमे इलेकट्रीकल्स, मे.ऊर्जा इलेकट्रीकल्स व मे.स्टार रिवाइंडर्स तसेच स्थानिक ग्रामस्थांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात मोलाची मदत केली आहे.
ममता पाण्डेय,
जनसंपर्क अधिकारी,
भांडूप नागरी परिमंडल
Be First to Comment