पोलीसांचे दुर्लक्ष कि अभय ?
सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |
रोहा तालुक्यातील तळाघर येथे बेकायदा मटका-जुगार सुरू असून त्यामुळे अनेक कुटूंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
येथे सुरू असलेला बेकायदेशीर मटका-जुगार खेळण्यासाठी या परिसरातील तरूण पीढी व वयोवृद्ध नेहमीच येत असून मोठ्या मेहनतीत कमविलेले पैसे ते या मटका-जुगारामध्ये घालवू लागले आहेत. परिणामी त्यांचे कुटूंब उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. पोलीसांनी या मटका व्यावसायिकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवल्यामुळे या मटक्यावर कारवाई होत नसल्याचे दिसत आहेत. अशा प्रकारे येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेले आहेत. परिणामी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने सदरच्या बेकायदा मटका-जुगार बंद करण्याची कारवाई करावी व या बेकायदा मटका जुगाराला साथ देणाऱ्या स्थानिक पोलीसांवरही कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.








Be First to Comment