सर्वत्र व्यक्त होत आहे हळहळ
सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव)
सध्या जगावर कोरोना सारख्या आजाराचे भयंकर संकट ओढवले आहे.प्रत्येक नागरीक चिंतेत आहे. तणावाखाली आहेत असे असताना रोहे तालुक्यातील खांब-कोलाड परिसरात दु:खद घटना घडली आहे.या विभागातील एक इसम व एक वयस्कर महिला पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.या दोन्ही दु:खद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे
याबाबत सविस्तर व्रुत्त असे की खांब विभागातील एक इसम विहिरीत बूडाला.तर कोलाड परिसरातील एक वयस्कर महिला कुंडलीकेच्या नदी पात्रात बुडली आहे.ती वयस्कर महिला घरातून दोन दिवस अगोदरच दिवस बेपत्ता होत्या तशी नोंद पोलिसात करण्यात आली होती.या कोरोना संकटात सतत टाळेबंदीमुळे रोजगार उपासमारीचे संकट कोसळले आहे. नागरिक आर्थिक संकटाला समोरे जात आहेत. कोरोना लवकर संपला नाही तर आर्थिक संकटाची अराजकता माजू शकते गेली ५ महिने नागरिक घरात डांबून ठेवल्या सारखे रहात आहेत.अशा वेळी नागरिकानी धीराने तोंड देने आवशक आहे. घरात करमत नाही,झोप येत नाही,पैसे नाहीत,कर्ज थकलेत अशी अनेकांची कारणे पुढे येत आहेत थोडक्यात नागरीक चिंताग्रस्त झालें आहेत .अशा वेळी घरातील वयोवृध व मुले यांना समजुन घेणे गरजेचे आहे रायगड जिल्ह्यात कोरोना ने अनेकांचे बळी गेले आहेत. तर इतर आजारानेही भयभीत होऊन सुधा नागरिक मरत आहेत अशा वेळी आलेल्या संकटाला तोंड देने गरजेचे आहे तरच अपण या कोरोनाला हरवू शकतो.
खांब कोलाड परिसरातील घटना ही अतिशय दुखद घटना घडली असुन कुटुंबावर यामुळे दु:खाचे डोंगर कोसळले आहे.






Be First to Comment