सिटी बेल | अलिबाग |
मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील व्यापारी संघटनेमधील 99 जणांची कोव्हिडं19 तपासणी करण्यात आली असून यामध्ये सुदैवाने कोणीही कोरोना बाधित आढळून आले नाही.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्ण संख्या ही वाढली आहे.त्या अनुषंगाने जिल्हा धिकारी निधी चौधरी यांच्या आदेशानुसार बोर्ली व्यापारी संघटनेने संघटनेमधील व्यापारी सदस्य यांची अँटिजेंन तपासणी करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी यांनी बोर्ली स्थानक येथे 9९ अँटिजेंन तपासणी करण्यात करण्यात आली.
यामध्ये कुणीही कोरोना बाधित आढळून आला नाही.आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामुळे करोनाच्या धास्ती बाळगणारे नागरीक हळूहळू घराबाहेर पडून तपासणी करू लागल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे.
बोर्ली येथे व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी अँटिजेंन तपासणी करावी यासाठी संघटनेचे अध्यक्ष जयवंत अंबाजी, सेक्रेटरी शशांक कासार,सभासद नरेंद्र शिंदे, सुचित्र चोगले, संजय पाटील , डॉक्टर अन्सार चोगले यांच्या सहित अन्य सदस्य यांनी परिश्रम घेतले.








Be First to Comment