सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढतच चालला आहे. आज उरणमध्ये एकूण २७ पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर १५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
देऊळवाडी १, मजिद मोहल्ला १, बोरी नाका ३, वाणी आळी उरण १, केगाव २, बोकडविरा १, मुळेखंड फाटा २, द्रोणागिरी कॉलनी १, डोंगरी ३, भेंडखळ १, पाणजे १, जासई २, दिघोडे १, धाकटी जुई १, जेएनपीटी १, वेश्वि १, कोप्रोली ३, विंधणे १ असे एकूण २७ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर उरण ३, नागाव पिरवाडी १, मोरा १, आवरे २, जसखार २, जेएनपीटी टाऊनशीप ४, वशेणी १, द्रोणागिरी कॉलनी १ असे १५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
एकूण पॉझिटीव्ह ७०३, बरे होऊन घरी सोडलेले ५३०, उपचार १५२, मयत २१ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
दोन दिवस पॉझिटीव्हचा आकडा कमी तर घरी सोडलेल्यांचा आकडा जास्त होता. परंतु आज एकदाच पुन्हा मोठा आकडा २७ पॉझिटीव्ह सापडले आहेत. यामुळे लॉकडाऊन करीत बाजारपेठ बंद ठेवूनही पॉझिटीव्हचा आकडा कमी येत नाही. जरी बाजारपेठ बंद असली तरी सकाळच्या रामप्रहरी काही दुकाने उघडी ठेवून सामानाची विक्री करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. मग बाजारपेठ बंद ठेवून फायदा होण्याऐवजी पॉझिटीव्हचा आकडा वाढल्याने फरक पडला असे वाटत नाही. तरी सकाळी दुकाने उघडी असणाऱ्या दुकानदारांची परवाने रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






Be First to Comment