प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या कार्यपद्धतीची पहिल्याच दिवशी झलक
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार)
प्रभारी मुख्याधिकारी म्हणून खोपोली नगरपरिषदेचा कारभार हाती घेतलेल्या सुरेखा भणगे यानी त्यांच्या कार्यपद्धतीचा नमुना पहिल्याच दिवशी दाखवत नियमाला हरताळ फासणा-या खोपोलीकराना वठणीवर आणले असून 15 हजार 900 रूपयांचा दंङ वसुल केला आहे.खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटेना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते रजेवर आहेत.खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचेकङे जिल्हाधिकारी यानी प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.खोपोली शहरात कोरोना रूग्ण दररोज सापङत असून सर्व नियमांचा फज्जा उङाला होता.आरोग्य यंञणेबाबत देखील तक्रारीचा पाऊस पङत होता.अशा परिस्थितीत खोपोली नगरपरिषदेचा प्रभारी कार्यभार मिळाल्यानंतर
गुरुवारी सकाळी साङेसहा वाजता खोपोली आणि शिळफाटा भाजी मंडई येथे सुरेखा भणगे यानी अचानक भेट दिली. मास्क न वापरणारे तसेच सामाजिक अंतर नियम न पाळणा-यावर धडक कारवाई करत दंङात्मक कारवाई केली आहे. मिठाईचे दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. खोपोलीला प्रथमच धङकेबाज मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या रूपाने मिळाला असून खालापूर शहरात त्यांनी कोरोना आटोक्यात ठेवण्यात मिळालेल यश खोपोली देखील मिळेल अशी चर्चा नगरसेवक देखील करत आहेत.
नियमांचे पालन न करणा-यावर कारवाई सुरूच राहणार आहे.आरोग्य सेवेबाबत तक्रारीबाबत आरोग्य अधिकारी यांची बैठक बोलवली असून खोपोलीत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
(श्रीमती सुरेखा भणगे-प्रभारी मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद)

खोपोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे या मास्क न वापरणारे तसेच सामाजिक अंतर न ठेवणारयांवर धडक कारवाई करताना छायाचित्रात दिसत आहेत.






Be First to Comment