Press "Enter" to skip to content

खोपोली बोरघाटात चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

पुणे भोसरी येथील महादेव हक्के असे चालकाचे नाव असून तो टेम्पो क्र.एमएच १२ केपी ०८१२ हा घेऊन पुण्याहून मुंबईकडे जुन्या मुंबई पुणे मार्गाने बोरघाटातून येत असताना,खोपोली बोरघाटात आज सकाळच्या सुमारास टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

वाहनाचा क्लिनर सुखरूप आहे. तर चालक अपघातानंतर वाहनात अडकून पडला होता. त्यावेळी अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांचा मदतीसाठी टीम आदीनी अथक प्रयत्न करत चालकाला बाहेर काढून त्याला खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.