सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
पेण वाशी विभागातील खाडी किनाऱ्यावरील बेनवेल गाव कोरोनाच्या भयानक परिस्थितीत जगत असून या गावात ५४ कोरोना बाधीत रूग्ण आहेत. त्यामुळे हा गाव प्रशासनाने पूर्णता लाॅकडाऊन केल्याने येथील रूग्णांना जीवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा व्हावा म्हणून राज कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा. चंद्रकांत ठाकूर आणि इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप (आय.झेड. मंडळ)रायगड यांच्या सौजन्याने जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप करण्यात आले.
या जीवनावश्यक वस्तूंमध्ये अर्धा लिटर दूध, १० अंडी, एक डझन केळी, दोन सफरचंद, दोन मोसंबी, १० लिंबू, १० बिस्कीट पुडे, एक हॅण्डवाॅश, एक लिटर पाणी बाॅटलचा एक बाॅक्स आदी वस्तूंचा समावेश होता.

या वेळी या रुग्णांची सेवा करणारे डाॅ. आशिर्वाद मोकल यांनी अशा प्रकारची मदत केल्याने ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. यावेळी त्यांनी सांगितले की गेल्या दोन तीन दिवसा पासून रुग्णांची संख्या स्थिर आहे. ही आमच्या साठी आनंदाची बाब आहे.
सदर कार्यक्रमास इंडिया झिंदाबाद (आय.झेड मंडळ) फ्रेण्डस गृप चे अध्यक्ष रमेश थवई, राज कोचिंगचे संचालक प्रा. चंद्रकांत ठाकूर, मंडळाचे कार्यरत सदस्य राकेश पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, महेंद्र पाटील, शंकर काथारा, रविंद्र पाटील, नरेश सावंत, संजय पाटील, दयानंद मोकल त्याच प्रमाणे डाॅ. आशिर्वाद मोकल, ग्रामस्थ मेघनाथ मोकल, प्रभाकर पाटील, विद्याधर भोईर, राजेंद्र मोकल, नारायण ठाकूर, राज ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment