सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
दिवसेंदिवस वाढत जाणारे हवेतील प्रदूषण, होणारा पर्यावरणाचा ऱ्हास,नष्ट होणारी नैसर्गिक साधन संपदा, मानवी हव्यासापोटी नष्ट होणारी जंगले यामुळे पृथ्वी वरील सजीवसृष्टी धोक्यात आली आहे त्यामुळे निसर्गसंवर्धन करणे आजच्या काळाची गरज झाली आहे.निसर्ग संवर्धन व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी वृक्षारोपण हा एक महत्वाचा उपाय आहे.त्या दृष्टीकोनातून सोमवार आरती मंडळ आवरे यांच्या माध्यमातून आवरे येथील मर्दनगड परिसरात वटवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सोमवार आरती मंडळाचे कौशिक ठाकूर सर,महेश गावंड सर,मधुकर कडू सोनारी,संदिप गावंड सर,विद्याधर गावंड सर,गणेशप्रसाद गावंड सर,गणेश ठाकूर,महेश गावंड, अविनाश ठाकूर,सुनील ठाकूर,शंकर पाटील,करण ठाकूर, सुरेश म्हात्रे, सुधाकर म्हात्रे,परेश गावंड,धीरज ठाकूर, अमेय ठाकूर, प्रित ठाकूर ,परेश गावंड उपस्थित होते.








Be First to Comment