Press "Enter" to skip to content

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

दिवसेंदिवस वाढत जाणारे हवेतील प्रदूषण, होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, नष्ट होणारी नैसर्गिक साधन संपदा, मानवी हव्यासापोटी नष्ट होणारी जंगले यामुळे पृथ्वी वरील सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. त्यामुळे निसर्गसंवर्धन, निसर्ग सरंक्षण करणे आजच्या काळाची गरज बनली आहे.निसर्गसंवर्धन व पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी वृक्षारोपण हा एक महत्वाचा उपाय आहे.त्या दृष्टीकोणातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवार दि 13/6/2021 रोजी सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत कोप्रोली आदिवासी वाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सोशल, फिजिकल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सदर वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला . झाडे, वृक्षवेली, जंगले, वनसंपदा जगली तर आपणही जगू, सजीवसृष्टी आनंदात राहील.पर्यावरणचे संरक्षण करण्याच्या दृष्टीकोणातून दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाते. यावर्षी संस्थेच्या माध्यमातून कोप्रोली येथे वृक्षारोपण करण्यात आले.ही झाडे जगविण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी दिली.

यावेळी सुदेश पाटिल,विठ्ठल ममताबादे, हेमंत पवार, ओमकार म्हात्रे,हेमंत ठाकूर, नितेश पवार, अभय पाटिल, समीर पाटिल, साहिल म्हात्रे, विकि पाटिल, प्रेम म्हात्रे, अनुदीप पवार, सागर घरत, पंकज शर्मा, महेश पाटिल, राज पाटिल, ऍडव्होकेट गुरुनाथ भगत, संजोग पाटिल, सुनील फुलोरे, राहुल प्रधान, प्रीतम वर्तक, गणेश म्हात्रे, हेमंत गावंड, रवी म्हात्रे, सुजल म्हात्रे, केशव पाटील, विकी म्हात्रे आदीं संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोशल फिजिकल डिस्टन्स पाळून वृक्षारोपण केले या उपक्रमास युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.