Press "Enter" to skip to content

अलीबाग तालुक्यात कोरोनाचा कहर

अलिबाग तालुक्यातील चौल ,रेवदंडा सासवणे, नागाव, नवेदर,नव गाव, कुरुळ, गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

सिटी बेल | रायगड | अमूलकुमार जैन |

अलिबाग तालुक्यातील चौल ,रेवदंडा सासवणे, नागाव, नवेदर,नव गाव, कुरुळ, विभागात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे.कोरोनाचा फैलाव इतका वाढला आहे की अगदी तळागळात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत.त्यातच कोरोना मुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण देखील वाढले आहे या बाबी लक्षात घेता प्रशासनातर्फे ठोस उपाय योजना करणे गरजेचे झाल्याने.अखेरीस चौल, रेवदंडा सासवणे, नागाव,नवगांव, नवेदर, करुळ, ह्या गावांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून, येथील विभागात नाक्या नाक्यावर सूचना फलक लावण्यात आले आहेत.

गावांतील नागरिकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही .केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना बाहेर जाता येणार इतर नागरिकांना कोरोना संदर्भात खबरदारी म्हणून तपासणी करवी लागणार आहे.
नागरिकांना मास्क वापरणे, सुरक्षित अंतरराखणे आवश्यक असणार आहे बाहेरून येणाऱ्याचा कसून तपास पोलिस यंत्रणेकरून होत आहे. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत तालुक्यातील चौल, रेवदंडा, सासवणे, नागाव, नवेदर, नवगाव, कुरुळ,गाव कंटेन्मेंट झोन मध्ये असणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.