सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा वाढत्या कहरराने बुधवारी एकाच दिवशी सात रुग्णांचा उपचार दरम्यान बळी गेल्याने आता संपूर्ण रोहा तालुक्यात चिंतेची बाब निर्माण झाली आहे तर कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने अधिक धोका वाढत आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणेकडून अधिक प्रमाणात उपाय योजनेची गरज आहे .
रोहा तालुक्यात मृत्यू दर वाढत असल्याने चिंताही वाढली आहे बुधवारी त्यात ४६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.९जुन रोजी सायंकाळी मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यात नवीन ४६ रुग्णआढळले आहेत तर २३ रुग्ण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहेत परंतु दुर्दैवाने मात्र सात रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ही बाब मात्र रोहेकरांसाठी चिंतेची आहे त्यामुळे प्रशकीय यंत्रणेवर अधिक ताण निर्माण झाले आहे .
तालुक्यात कोरोनाचे ७६५ रुग्ण आता उपचार घेत असून कोविड १९ ने बाधित झालेले एकूण रुग्ण संख्या ६०९८ वर पोहचली तर आता पर्यंत १८४ रुग्णांचा उपचारा दरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.आरोग्य यंत्रणेच्या यस्ववी प्रयत्ना नंतर तसेच ,स्वतःच्या इच्छाशक्ती व रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर आता पर्यंत रोहा तालुक्यात ५१४९ रुग्णांनी कोरोणावर यशस्वीपणे मात करत ठणठणीत बरे होत सुखरूप घरी असल्याची माहिती देण्यात आली आहे.








Be First to Comment