रोह्यात आज नव्याने ५ रुग्णांची नोंद
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
रोहे तालुक्यातील रोहे,नागोठणे, कोलाड,परिसरात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही.दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा नवीन रेकॉर्ड स्थापन करत असून,आज नव्याने ५ रुग्ण पाँझिटिव्ह सापडल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
रोहे तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरशः थैमान घातले आहे.तर सुरक्षितेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या लाँकडाऊनच्या आदेशानुसार
रोहे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.मात्र वाढती रुग्ण संख्या पाहता रोह्यात करण्यात आलेले कडक लाॅकडाऊनची मात्रा देखील लागू पडलेली दिसत नाही.
आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने ५ रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ४०३ वर पोहोचली आहे.सध्या ९८ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात ९ जण मयत झाले आहेत.तर २९६ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले असले तरी नवे रुग्ण कोरोना बाधित होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालल्याने.ही बाब चिंतेची ठरत आहे .
या महामारीत कोरोनाचा आजार रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेऊन आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण कसे होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.तर घरीच रहा सुरक्षित रहा असे संदेश वारंवार प्रशासनाकडून देण्यात येत आहे.






Be First to Comment