सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
रायगड जिल्हा म्हणजे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु त्यांच्या जाण्याने जिल्ह्यात कमकुवत झालेल्या काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचे काम आपण ओबीसीसेलच्या माध्यमातून करू असे आश्वासन नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश ओबीसीसेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिले. त्यांची निवड होताच त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला. त्याची सुरुवात उरण तालुक्यापासून केली. यावेळी त्यांनी उरणमधील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या व्यथा जाणून संवाद साधला.
ओबीसी आरक्षण, समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्याची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल अध्यक्ष भानुदास माळी यांनी उरण येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर जनजागृती आणि कार्यकर्ता भेटी-गाठी संवाद व नवीन पदाधिकारी नेमणूकबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष भानुदास माळी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. ही सुरवात उरण मधून करण्यात आली. या दौऱ्यात त्यांनी उरण तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग अध्यक्ष नंदकुमार कुंभार ,प्रदेश काँग्रेस ओबीसी सेल सरचिटणीस बाळाराम वास्कर,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,तालुका अध्यक्ष जेे. डी. जोशी,प्रदेश कॉग्रेस ओबीसी सरचिटणीस उमेश भोईर,काँग्रेस शहर अध्यक्ष किरीट पाटील,ओबीसी प्रदेश सदस्य संतोष रसाळकर ,उरण काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत, महिला जिल्हा उपाध्यक्ष संध्या ठाकूर, अखालाक शिलोत्री , सदानंद पाटील आदी कार्यकर्ते, उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष जेे. डी. जोशी यांनी पक्षातील दुफळीच्या व्यथा मांडल्या.पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या
विविध मागण्यांकडे वरिष्ठ पातळीवरून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.कार्यकर्त्यांनाच वरिष्ठांचे बळ मिळत नाही.त्यामुळे पक्षांचे बळ वाढणार कसे आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असे असा सवाल करुन स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या व्यथा वरिष्ठांपर्यत पोहचविण्यात याव्यात अशी मागणी केली.
उरण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या व्यथा वरिष्ठांपर्यत पोहचविण्यात येतील.तसेच त्यांना पक्षीय बळ मिळविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल अध्यक्ष भानुदास माळी यांनी उरण तालुक्यातील उपस्थित कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले.तसेच ओबीसी समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही माळी यांनी केले.
यानंतर माळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मराठी समाजाच्या
आरक्षणासाठी महाआघाडीने सरकार सकारात्मक पावले उचलली आहेत.प्रश्न तातडीने सुटण्यासाठी कॉंग्रेसही सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचेही माळी यांनी सांगितले.








Be First to Comment