सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
कोरोना संसर्गात तोंडाला मास्क न लावता भेलपुरी विकणाऱ्या विक्रेत्याला विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रसायनी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक
सात जून रोजी संध्याकाळी सहा वाजता कांबा गावाच्या हद्दीत प्रजापती( रा. केदारलिंब बिल्डींग रिस ता. खालापुर) हा विना मास्क भेलपुरी,पानीपुरी विक्री करत असताना मिळुन आला . त्यांने कोरोना विषाणु रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली घातक कृती केल्याने त्याच्या विरोधात जिल्हाधिकारी रायगड यांचे कार्यालयीन आदेशाचे उल्लंघ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक एच बैकर हे करीत आहेत.







Be First to Comment