सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
सावरोली गावचे हद्दीत इंडीया बुल कंपनीचे इमारतीच्या पहील्या माळयावर चौथ्या रूममध्ये अज्ञात चोरटयाने प्रवेश करून सुमारे 75 हजार रुपये किमतीचा चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंडिया बुलच्या इमारतीत एस व्हीए कंपनीच्या इलेक्ट्रिक साहीत्य ठेवले होते. रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने रूमच्या दरवाज्याचे कुलुप तोडुन त्यावाटे प्रवेश करून आतील रूमच्या दरवाज्याचे कडी कोंयंडा तोडुन 75हजार रुपये किमतीचा माल घरफोडी व चोरी करून नेला.
याबाबत खालापूर पोलीस भा.दं.वि.कलम 380 , 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि शेखर लव्हे हे करीत आहेत.








Be First to Comment