जुन्या आठवणींना दिला उजाळा
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
कोकण एज्यकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील गु.रा. अग्रवाल विद्यामंदिरच्या सन १९७७ च्या दहावीतील वर्गमित्रांचा छोटासा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मुंबई – गोवा महामार्गालगत असलेल्या नागोठण्यातील हॉटेल कल्पतरू येथे आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.
त्यानिमित्ताने सर्व मित्रांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भेटी दरम्यान सर्व वर्गमित्रांनी अविस्मरणीय क्षण अनुभवाला. यावेळी उदय भिसे, जहूरुद्दीन सय्यद, मनिषा सोष्टे, विकास कोते, बाळाराम पोटे , रमेश जैन , अशोक जैन , इम्तियाज अधिकारी, कीर्तिकुमार कळस आदींसह काही मित्रांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या.
याबाबत बोलताना क्रियाशील वर्गमित्र कीर्तिकुमार कळस यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे सर्व वर्गमित्र एकत्र येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो.अखेर आमच्या प्रयत्नाला यश आले आणि तो अविस्मरणीय क्षण रविवारी आम्ही अनुभवाला. यावेळी फारच हृद्य असा कार्यक्रम झाला. आपल्या आठवणी सांगताना काहीजण भावुक झाले. मेघश्याम शेलार , नाझीम नालखंडे , दत्ता वास्कर विडिओ कॉलिंग द्वारे जोडले गेले. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. पुढील जीवन जगण्यासाठी एक पॉसिटीव्ह ऊर्जा मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.
आमच्या वर्गातील स्वर्गीय निजाम सय्यद, महादेव इप्ते, विजय घाग व मालती काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर वर्गमित्र इम्तियाज अधिकारी याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गेट टुगेदरच्या गोड आठवणी बरोबर घेऊन सर्वांनी निरोप घेतला अशी माहिती शेवटी कीर्तिकुमार कळस यांनी दिली.








Be First to Comment