सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून मागील 15 दिवसापासून एक_पाऊल_विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू असून या उपक्रमाच्या माध्यमातून पहिली पासून ते पीजी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देऊन त्यांना दिलासा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. या लढ्याला पहिले प्राथमिक यश आले असल्याची माहिती राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष कु. अक्षय नागोठणेकर यांनी पत्रकारांना दिली.
अधिक माहिती देताना कु. अक्षय नागोठणेकर यांनी सांगितले की पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या फी बाबत काही तक्रार असल्यास अपील करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या विभागांत विभागीय शुल्क नियामक समिती गठीत करण्याची अधिसूचना सोमवारी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाडयांनी जाहीर केली आहे.
नागोठणेकर पुढे म्हणाले की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चे हे प्राथमिक यश आहे. आम्हाला अजून पुढे जायचे आहे. एक_पाऊल_विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सर्वच वर्गांच्या आणि विविध शाखांच्या विद्यार्थ्यांना फी मध्ये दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आमचा लढा पूर्णतः यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे व आमदार श्री.अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कोकण प्रमुख किरण शिखरे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करीत आहोत.
या प्रयत्नात समाजाचा भाग म्हणून समाजातील सर्वच वर्गाने (विद्यार्थी, पालक, नागरिक, सरकारी संस्था, सरकारी यंत्रणा) यांनी सहभागी होईन सहकार्य करावे असे आवाहन रोहा तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष कु. अक्षय नागोठणेकर यांनी केले आहे.








Be First to Comment