सिटी बेल |अनिल घरत | सारडे |
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे ,पक्षीही सुस्वरे आळविती !… ह्या संतवाणीतून संपूर्ण मानवजातीला दिलेले मानवतेचे धडे आणि जीवन जगण्याकरीता शिकवलेली जीवनमूल्ये यांची थोर परंपरा त्याच सोबत, आपल्या पूर्वज्यानीं जतन केलेला हा निसर्गसंवर्धन आणि संरक्षणाचा अमूल्य वारसा आपण या पुढेही असाच सुरु ठेवणं आज काळाची गरज बनली आहे.
आधुनिकीकरण.. आणि … विकासाच्या… नावाखाली होत चाललेला निसर्गाचा ऱ्हास आणि त्याचे संपूर्ण मानवजातीला भोगावे लागणारे परिणाम किती भयानक आहेत याची प्रचिती आज सर्वजन पाहतच आहोत… घड्याळाच्या काट्याप्रमाणे गतिमान झालेल्या आजच्या पिढीला मात्र !…निसर्गचक्राचा विसर पडला आहे ….आणि तोच विसर येणार्या नवीन पिढीला घातक ठरण्याचे संकेत आज निसर्ग आपल्याला देत आहे. आणि म्हणूनच प्रत्येकानं आपली सामाजिक जबाबदारी समजून आपल्या कुटुंबाच्या वतीनं किमान एक- दोन तरी झाडं लागवड करून त्याचं संगोपन केलं पाहिजे आणि ह्या रानावनांच्यां देवराईचं जतन केलं पाहिजे. आणि अश्याच निसर्गसंवर्धन आणि संरक्षणाच्या कार्यात प्रामाणिक पणे आपलं अमूल्य योगदान देणारी अनेक व्यक्तीमत्व आणि अनेक सामाजिक संस्था आजपण आपलं अमूल्य योगदान देताना दिसत आहेत …त्यातलंच एक नावं … सारडे विकास मंच…
ह्या संस्थेच्या माध्यमातून …काही दिवसापूर्वी एक आवाहन करण्यात आलं होतं … एक कुटुंब एक झाडं….आमचा खड्डा तुमचं झाडं… हि संकल्पना राबवत…. तुमच्या कडे जर वेळ नसेल,…तुमच्या कडे जर जागेचा अभाव असेल,…तुम्हांला जर झाडांची लागवड करता येत नसेल …. तर….तुम्ही आमच्या संस्थेकडे जेवढे आपल्याला शक्य होतील तितके …वृक्षदान … करु शकता किंवा त्या झाडांच्या सरासरी किंमती येवढी रक्कम …आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष … रोहित पाटील यांच्या गुगल पे नंबरवर ट्रान्सफर करून आपला सहभाग नोंदवू शकता…. आणि…. ह्याच आवाहनाला सर्व स्तरातून एवढा उदंड प्रतिसाद मिळाला कि अनेक मोठमोठ्या व्यक्तीमत्वांपासून ते लहान बालगोपालांनीं सुद्धा ह्या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद देत…. कुणी आपल्या जन्मदिनाच औचित्य साधत, तर कुणी आपल्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त …तर कुणी निसर्गसंवर्धनाच्या ह्या मोहिमेत आपलं योगदान लाभावं म्हणून…. ह्या संकल्पनेत वृक्षदान…केलं….खरं सांगायचे तर … आमचा खड्डा तुमचं झाडं …ह्या संकल्पनेत झाडं लागवडी करीता खोदलेले खड्डे कमी पडायला लागल्या मुळे अक्षरशः आणखी नवीन खड्डडे खोदायला लागले या वरूनच ह्या संकल्पनेतून साकार झालेल्या कार्यक्रमाची व्याप्ती दिसून आली.
एक कुटुंब एक झाडं ह्या संकल्पनेला …आणि … सारडे विकास मंचच्या सर्व सहकाऱ्यांच्यां अथक परिश्रमांनं आणि एका आगळ्या वेगळ्या पर्यावरण पूरक विचारधारेनं साकारलेल्या ह्या….कार्यक्रमात मान्यवरांना सन्मानीत करून सर्वांना खास आकर्षक भेटवस्तू… उमेश गावंड ( वडाला मुंबई )…यांच्या कडून देण्यात आल्या तर निसर्ग संवर्धनाच्यां कार्याची दखल म्हणून प्रमाणपत्र सुनिल नऱ्हे सर यांच्या कडून तर सर्वांसाठी थंड पेय ऑरेंज ज्युसचं वाटप अल्पेश जोशी यांच्या तर्फे करण्यात आलं…. ह्या पावन कार्याला … प्रमुख उपस्थिती दर्शविली ती …केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक … राजू मुंबईकर, अतिश पाटील ( मराठी,हिंदी क्रिकेट समालोचक पागोटे ), प्रसाद पाटील, (माजी सरपंच वशेणी ) संतोष पाटील ( शिवसेना विभाग प्रमुख नेरूळ ), रविंद्र पाटील सर,निवास गावंड सर ( आवरे ), विलास पाटील सर, संतोष खंडागले, सौ खंडागळे ( पळस्पे ), करण ठाकुर, जितेंद्र थळी, प्रशांत म्हात्रे सर, दुशंत ठाकूर, दिनेश पाटील (कलंबूसरे ), अनिल घरत (पिरकोन ), शिवकुमार म्हात्रे, दिपक पाटील, शशिकांत ठाकूर ( केळवणे ) प्रितम वर्तक सर, ( गोवठणे ) रोहित पाटील,रोशन पाटील ,संपेश पाटील, क्रांतीलाल म्हात्रे,मंगेश पाटील, प्रतिश म्हात्रे,प्रितेश म्हात्रे, हितेश म्हात्रे, संदेश पाटील, नितेश पाटील,सागर वर्तक,मयूर म्हात्रे, जितेंद्र पाटील,सुजित पाटील ( पिरकोन ), सौ.स्वातीताई पाटील( वशेणी ), सौ.रुपाली ताई म्हात्रे,सौ.स्नेहा ताई पाटील रिया दीदी आणि महिला भगिनीं सोबतच बच्चे कंपनी आणि
सर्व निसर्गप्रेमी सहकारी वर्गाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण येथे येणार्या काळात आपल्या अंगावर हिरवागार शालू पांघरलेल्या वनराईच सुंदर नटलेलं रूप येथे येणार्या पर्यटकां सोबतच निसर्गप्रेनी जनतेला पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही.

















Be First to Comment