मुख्याधिकारी यांच्या बरोबर उरण शहरातील नागरी सुविधा व विविध विषयावर चर्चा
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
मंगळवार दिनांक ०८ जुन २०२१ रोजी शिवसेनेने उरण नगरपालिकेवर धडक देत उरण शहरातील विविध प्रशांवर व नागरी सुविधा बाबत मुख्याधिकारी यांच्या बरोबर सखोल चर्चा केली.
उरण नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात नगरसेवक अतुल ठाकूर, नगरसेवक समीर मुकरी, उपशहर प्रमुख गणेश पाटील, अवजड वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, मा. शहर संघटक महेश वर्तक, प्रवीण मुकादम, उपविभाग प्रमुख धीरज बुंदे युवा सेनेचे शहर प्रमुख नयन भोईर, संदेश पाटील, योगेश गोवारी, सोहम शिरधनकर, यांचा समाविष्ट होता.
या वेळी चक्रीवादळामुळे दिनांक १७ मे २०२१ रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करावी, श्री राम मंदिराला लागून असलेली अनधिकृत टपऱ्या त्वरित हटवाव्या, M N T C बस सेवा उरण शहरात पूर्वरत सुरू करावी, उरण शहरातही रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत व पेव्हर ब्लॉक निघाले आहेत, पावसाळ्या पूर्वी सर्व व्यवस्थित करून घावेत, पावसाळ्या पूर्वी सर्व गटारांची साफ सफाई करून घेणे, शहरातील इलेक्ट्रिक पोळ यांना सेफ्टी बॉक्स बनवून घेणे
आशा विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली व या सर्व विषयांवर कारवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी शिवसेना शिष्टमंडळास दिले आहे.








Be First to Comment