दोघांचा अहवाल कोरोना पाॅजिटीव्ह
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या पुढाकाराने व लोहोप आरोग्य केंद्राच्या कमिटी अध्यक्षा उमाताईं मुंढे व आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने मोहोपाड्यात तीन आसनी रिक्षाचालक मालक संघटनेच्या तसेच मोहोपाडा बाजारपेठेतील शिवसेना शाखा कार्यालयात आरोग्य खात्याकडून रॅपिड ऍटींजन तपासणी करण्यात आली.या चाचणीचा अहवाल पाहिला असता 51 रिक्षाचालकांतील दोघांचा तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आला आहे.तर 44 व्यापा-यांत सर्वच निगेटिव्ह आले आहेत.
सदर चाचणीत एकही व्यापारी पाॅजिटिव्ह सापडला नाही.याअगोदरही 133 व्यापा-यांची ऍंटीजन चाचणी करण्यात आली होती.ते सर्वच निगेटिव्ह आले होते.मोहोपाडा रसायनी परिसरासाठी दिलासादायकही आहे.

यावेळी राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताईं मुंढे,माजी सरपंच संदिप मुंढे,वर्षां पाटील, आरोग्यसेवक आय.पी.पानगे,आरोग्य खात्याचे कर्मंचारी आदींसह रिक्षाचालक व व्यापारी उपस्थित होते.
मागील महिन्याभरापासून परिसरातील नागरिकांनी अधिक काळजी घेतल्याने गेल्या वीस दिवसांत कोरोनारुग्णसंख्या खालावली आहे.तरी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन परिसरातून कोरोना हद्दपार करावा असे आवाहन होत आहे.








Be First to Comment