Press "Enter" to skip to content

बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या व्यक्तीचा मृत्यू  

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

रस्ता ओलांडणार्‍या 60 वर्षिय व्यक्तीला खाजगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पनवेल मार्गावर खांदा कॉलनी येथे घडली. या अपघातानंतर बस चालक पळुन गेला असून खांदेश्वर पोलिसांनी सदर बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव मारुती पांचाळ (60) असे असून ते पनवेल मध्ये कुटुंबियांसह रहाण्यास होते. पांचाळ सुतारकाम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ते खांदा कॉलनी परिसरात काम करण्यासाठी आले होते. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते खांदा कॉलनी येथील तलावाजवळून मुबंई पनवेल मार्ग ओलांडून जात होते. याचवेळी मुंबईहुन पनवेलच्या दिशेने जाणार्‍या खाजगी बसने त्यांना धडक दिली. यात पांचाळ गंभीर जखमी होऊन मृत पावले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.