सिटी बेल | उरण | घनश्याम कडू |
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना महामारीत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य विषयक कार्य व रक्तदान शिबिरे आशा विविध कार्याने प्रभावित होऊन उरण शहरातील मुस्लिम व ख्रिश्चन कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदा मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली व अल्पसंख्याक सेलचे उरण तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक झहीर कुरेशी यांच्या प्रयत्नाने हा प्रवेश सोहळा पार पडला.
प्रवेश करण्यामध्ये ओबेद बक्षी, यासिन मुकादम, कफीद अन्सारी, अकील अन्सारी, वसील अन्सारी, नदीम कर्वेकर, मतीन शेख, बशीर शेख, हुसेन शेख, शाने अहम्मद शेख, हमजा खतीब, लुकास फर्नांडिस, बद्दरुद्दीन फसाटे, सरफराज शेख, जुल्फिकार तुंगेकर, गुफरान शेख, अखिल शेख, शेहनबाज खान, मेहराज शेख, आसिफ कसाई, अब्बास बिबरी, खान आयुब, इमरान अहमद, उपमिर सिद्धीक्की, नबी मुजावर, लतीफ राज, फजल अन्सारी, सुभाष पाटील, जमीर बसिर सय्यद, इबेन हसन अस्नारी, अकील भाई, लुकमान पेंटर, इशरत शेख, शान अहमद खान, अनिता पाटील, शाबीर केलकर, नबी हसन अन्सारी, मोहम्मद भाई, रझाक शेख आदींनी आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेना जातीपातीचे राजकारण करत नाही. येणाऱ्या उरण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मुस्लिम समाजाचा योग्य सन्मान करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व गटनेते गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन करून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.
सदर पक्ष प्रवेशाच्या वेळी कामगार नेते महादेव घरत, उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक के एम घरत, अल्पसंख्याक सेलचे उरण विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, सय्यद मुस्तफा, इरफान पठाण,डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, कासमभाट शाखाप्रमुख प्रदीप शेळके व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment