Press "Enter" to skip to content

ग्रँडवेल नॉर्टन कंपनी कडून कोविड हॉस्पिटल उरणसाठी घसघशीत मदत

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरणमधील ग्रँडवेल नॉर्टन कंपनी कडून कोविड हॉस्पिटल उरणसाठी लाखो रुपयांच्या साहित्यांची मदत केली. या कंपनीकडून नेहमीच मदतीचा हातभार मिळत आहे.

सध्या जगावर खूप मोठे करोना नावाचे संकट आले आहे.त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे व होत आहे. आपल्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी ही आपल्या डोळ्यासमोर आपल्याला सोडून जात आहेत.आपण त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत,प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश मिळते किंवा मिळत नाही. परंतु प्रयत्न मात्र सुरूच आहेत.

अशा या महामारीच्या वेढ्यातून सुटण्यासाठी उरणमध्येही डी.सी.एच.सी.कोवीड सेंटर कार्यरत झाले आहे. या सेंटर मध्ये काम करणारे डॉक्टर,पॅरामेडिकल स्टाफ व इतर कर्मचारी यांना सातत्याने त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी संरक्षण कवच म्हणून आवश्यक असणारे मास्क, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर ई. त्याच प्रमाणे रुग्णांना आवश्यक असणारी मेडिसिन उपलब्ध करून दिले.

अशा साहित्याची नितांत आवश्यकता विचारात घेऊन गेले वर्षभर ग्रंडवेल कंपनीकडून सातत्याने, जेव्हा जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा या वस्तूंचा पुरवठा केल्यामुळे कोविड हॉस्पिटल उरण मधील अधिकारी-कर्मचारी यांना रुग्णांची योग्य रीतीने सेवा करता आली. त्यांना काम करणे सोयीचे झाले आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे कंपनीने वेळोवेळी केलेले सहकार्य होय.

आज ग्रँडवेल कंपनीच्या वतीने कोविड हॉस्पिटल उरण मधील रुग्णांना अत्यावश्यक असणारे दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तसेच ५ बायपॅक मशीन असे एकूण सव्वीस ते सत्तावीस लाखाचे साहित्य कंपनीचे पदाधिकारी तसेच कंपनीचे कामगार प्रतिनिधी हे संयुक्तपणे डी. सी.एच.सी.सेंटर मध्ये स्वतः घेऊन आले आणि आपल्या विभागाच्या प्रांत अधिकारी श्रीमती ललिता बाबर मॅडम तसेच तहसीलदारसाहेब श्री. भाऊसाहेब अंधारे आणि वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल ऑफिसर डॉ. श्री. मनोज भद्रे यांच्याकडे सुपूर्त केले.

ही मदत फार मोठ्या स्वरूपाची आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणारी यंत्रसामुग्री असल्यामुळे रुग्णांना तसेच डी.सी.एच.सी. मध्ये काम करत असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना समाधान देणारे तसेच त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आवश्यक ठरत आहे त्याचप्रमाणे कंपनीच्या वतीने डी. सी. एच.सी.मध्ये कार्यरत डॉक्टर,नर्सेस आणि इतर कर्मचारी यांना देखील सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला स्वतः उपजिल्हाधिकारी श्रीमती ललिता बाबर, तहसीलदार श्री.भाऊसाहेब अंधारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री. मनोज भद्रे, सीनियर इन्स्पेक्टर श्री. शिंदे साहेब, समन्वय श्री.संतोष पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील,डॉ. सचिन गावंड,डॉ. स्वाती म्हात्रे, प्रा. राजेंद्र मढवी,सिस्टर इन्चार्ज शितल राऊत मॅडम ई.उपस्थित होते तसेच ग्रंडवेल कंपनीचे प्लांट हेड श्री. कवलजित सिंग, परचेस मॅनेजर श्री.डांगे, मार्केटिंग डिपार्टमेंट चे श्री. लक्ष्मीनारायण ऍडमिनिस्ट्रेशर मॅनेजर श्री. आय.बी.सिंग, प्रोडक्शन हेड श्री.झहीर चौधरी, कस्टम सर्विस चे श्री.सचिन वैद्य,असिस्टंट एडमिन ऑफिसर श्री.गणपत काटेकर आणि कामगार प्रतिनिधी श्री. रमाकांत पाटील,श्री. डॉमनिक कोळी व श्री. कदम हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.