Press "Enter" to skip to content

नाशिकच्या महिलेवर खालापूरात अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा दाखल

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

कामाची आणि पैशाची आवश्यकता असलेल्या महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर बळजबरी अत्याचार करणाऱ्या महालिंग शिवलिंग जंगम (राहणार पुणे) आणि राजाराम (राहणार पुणे पूर्ण नाव माहिती नाही) या दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ही पंचवटी नाशिक येथे राहणारी असून तिला पैशाची आणि कामाची गरज होती. तिच्या गरजेचा गैरफायदा घेत महालिंग जंगम यांनी तिला सोन्याच्या पिढीवर कामाला लावतो असे सांगितले .19 फेब्रुवारी 2020 रोजी पीडित महिलेला सोन्याची पेढी बघण्यासाठी जायचे सांगून महालिंग आणि राजाराम यांनी गाडीतून खालापूर येथे नेले. गाडीतच महालिंग याने पीडितेच्या खांदयावर हात टाकला व केसावरून हात फिरवुन तु माझ्या सोबत शरीरसंबंध ठेव तुला काम करायची काहीच गरज नाही. मी तुला भरपुर पैसे देईन असे सांगितले. पीडितेने विरोध केला असता महालिंग याने दम देवुन तु शांत बस असे सांगितले. गाडी रात्रीच्या अंधारामध्ये खालापूर हद्दीत सामसुम ठिकाणी झाडांमध्ये थांबवुन दम देवुन महालिंग याने जबरदस्ती बलात्कार केला. त्यावेळी राजाराम याने पीडितेचे फोटो त्याचे मोबाईल मध्ये काढले.नंतर राजाराम याने देखिल जबरदस्ती बलात्कार केला.

बलात्काराबाबत कोणस काही एक सांगितल्यास किंवा पोलीसांत तक्रार केल्यास तुझे अश्लील फोटो प्रसारीत करू आणि तुला ठार मारून टाकु अशी धमकी दिली. भीतीपोटी पीडितेनी याबाबत कोठे वाच्यता केली नव्हती. परंतु त्यानंतरही राजाराम आणि महालिंग वारंवार त्रास देत असल्याने सर्व असह्य झालेल्या पीडितेने खालापूर पोलीस ठाणे गाठत दोघांविरोधात अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम 354 अ, 376ड, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि संजय बांगर हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.