सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
सदानंद भुऱ्या पाटील हे पागोटे गावचे रहिवाशी असून ते सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधून 28 वर्षे सेवा करून आपल्या वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले.
सदानंद पाटील यांचा षष्टपूर्ती व सेवानिवृत्त सोहळा त्यांच्या निवास स्थानी आयोजित करण्यात आला. त्यांची सुविद्य पत्नी सौ सविता सदानंद पाटील या उभयतांचे आरती ओवाळून औक्षण करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य, सी डब्लू सी चे कर्मचारी अरुण पाटील, जयराम तांडेल, करून पाटील, हरेश्वर पाटील, रत्नकांत पाटील, नरेश भोईर, जेष्ठ नागरिक संघटनेचे मनोहर पाटील, खादी ग्रामोद्योग मंडळाचे चेअरमन मुकुंद पाटील, सरपंच सुमित पाटील, गोपाळ पाटील, यशवंत पाटील, भरत पाटील, चंद्रकांत पाटील, जगदीश पाटील, किरण तांडेल आदी मान्यवर सोशल, फिजिकल डिस्टन्सचे कोटेकोरपणे पालन करून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पाटील यांनी केले.
सेवेत काम करत असताना आपल्या वरिष्ठांशी आदराने प्रामाणिकपणे वागुण, आपल्या सहकाऱ्यांशी मनमिळावू व सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सर्वांची मर्जी सदानंद पाटील यांनी संपादन केली होती. अशा या प्रेमळ व्यक्तिमत्वाला सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment