सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
नवघर मधून भेंड़खळ च्या दिशेने जाणारा रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे नवघर मनसे कडून खराब रस्त्याच्या निषेधार्थ रविवार दी.06 जून 2021 रोजी मनसेतर्फे फलक झळकावुन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी नवघर मनसेचे शाखा अध्यक्ष कु.महेश सुरेश पाटील, कार्याध्यक्ष कु.विनायक प्रभाकर बंडा, सल्लागार कु.प्रफुल भगवान भोईर,अभिनेते आणि मनसे कार्यकर्ते कु.चरण सुरेश पाटील, सेक्रेटरी कु.प्रशांत मनोहर पाटील, सह सेक्रेटरी विवेक हरिचंद्र ठाकुर,महाराष्ट्र सैनिक/कार्यकर्ते हेमंत बंडा,देवेंद्र म्हात्रे, चेतन तांडेल आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते सोशल, फिजिकल डिस्टन्स ठेवून व मास्क सॅनिटायझरचा वापर करत उपस्थित होते.
गेल्या वर्षाभरा पासून या खड्डेमय रस्त्यावरून जाताना सामान्य नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.आणि यासाठी कारणीभूत असलेले या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे वजन काटे आणि या वजन काट्यांवर येणारी अवजड वहाने यामुळे या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली आहे. हा रस्ता अवजड वाहनांसाठी नसताना देखील या मार्गावर खुप मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येत जात असतात.यांच्यावर कारवाई कधी होईल ? आणि सामान्य नागरिकांना चांगला रस्ता कधी मिळेल.लोकप्रतिनिधि आहेत कुठे ? सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो की नाही ? असा सवाल निषेध करणाऱ्या मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला, सबंधित लोकप्रतिनिधींना विचारला आहे.
लवकरच सामान्य नागरिकांना चांगला रस्ता मिळावा अशी माफक अपेक्षा यावेळी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.








Be First to Comment