Press "Enter" to skip to content

खालापूरात व्यापाऱ्यांची ऍंटीजन चाचणी : नगरपंचायतीचा पुढाकार

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

नगरपंचायत खालापूर हद्दीतील व्यापाऱ्यांची ऍंटीजन तपासणी शनिवारी करण्यात आली. रायगड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने पोलीस कर्मचारी आणि व्यापारी यांची ऍंटीजन तपासणी करण्यात येत आहे.

शनिवारी नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांच्या पुढाकाराने खालापुरातील व्यापारी ,टपरीधारक , हातगाडी व्यवसाय करणारे यांची ऍंटीजन तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर येथे करण्यात आली.

खालापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा यांनी सर्व दुकानदारांना ऍंटीजन तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला व्यापारी वर्गाने उत्तम प्रतिसाद देते तपासणीत सहभागी झाले. खालापूर नगरपंचायत हद्दीतील सुमारे 95 दुकानदारांची तपासणी करण्यात आले 95 पैकी एकाचा तपासणी अहवाल
पॉझिटिव्ह आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.