सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
आज दिनांक ०५/०६/२०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घारापुरी येथे वृक्षारोपण व माझी वसुंधरा अंतर्गत सामुहिक शपथ व वृक्षारोपण करण्यात आले.तसेच कोव्हीडमुक्त घारापुरी अंतर्गत आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व ग्रामस्थांना कोव्हीड १९ वर लसीकरण करण्यात आले.
शिवसेनेचे घारापुरी चे सरपंच बळीराम ठाकुर यांनी आरोग्य विभाग, पालकमंत्री व राजिप यांच्याकडे घारापुरी बेटावरील ग्रामस्थांना वॅकसीन लस देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्याप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोईर यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी सदरची लस उपलब्ध करून दिली.
आज घारापुरी बेटावरील 125 ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ घेता आला असून येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तसेच लवकरच उरलेल्या ग्रामस्थांना लस देण्यात येणार आहे.



आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.किरण पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकुर,मोरे
जिल्हा आरोग्य अधिकारी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.कल्पना गाडे, बांधकाम विभागाचे देवांक, अनिल देशमुख साहेब,विस्तार अधिकारी नारंगीकर, आरोग्य विभागाचे
भोसले, इटकरे, तसेच त्यांचे सहकारी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सचिन म्हात्रे,सदस्य भरत पाटील,मंगेश आवटे, सदस्या सौ.मीना भोईर, सौ.ज्योती कोळी, सौ.सुभद्रा शेवेकर,सौ.शुभांगी मायने तंटामुक्त कमीटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर, ग्रामसेवक श्रीमती संचिता केणी, पवित्र कडु तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून घारापुरी बेटावर आलेल्या सर्व अधिका-यांचे तसेच ग्रामस्थांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी आभार मानले.








Be First to Comment