Press "Enter" to skip to content

नवपरिवर्तन संस्थेतर्फे स्व.लक्ष्मण ठाकूर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा ऑक्सिजन कमी होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे झाडे लावून ऑक्सिजन पुरवठा वाढण्यास मदत होईल. नवपरिवर्तन संस्थेचे क्रियाशील सदस्य लक्ष्मण ठाकूर यांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. त्यानिमित्त जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत लक्ष्मण ठाकूर यांच्या स्मरणार्थ आज द्रोणागिरी गडावर वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करणे यासाठी जगभरात अनेक देशात दरवर्षी ५ जून जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे.

नवपरिवर्तन संस्था गेली अनेक महिन्यापासून सामाजिक कार्य करीत आहे. या संस्थेचे सदस्य लक्ष्मण ठाकूर हे सर्व कामांत आघाडीवर असत. ते गडावर गेल्यानंतर हातात झाडू घेऊन आपल्या कामात मग्न असत. परंतु त्यांना कोरोनाची लागण होऊन काही दिवसांत आमच्यात नेहमी हसत खेळत असणारे व्यगतिमत्व लक्ष्मण ठाकूर आमच्यातून कायमचे निघून गेले.

लक्ष्मण ठाकूर यांच्या अचानक जाण्याने नवपरिवर्तन संस्थेची कधी भरून येणारी पोकळी निर्माण झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल राखण्यासाठी व ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत द्रोणागिरी गडावर नवपरिवर्तन संस्थेच्या माध्यमातून स्वर्गीय लक्ष्मण ठाकूर यांच्या स्मरणार्थ आज वृक्षारोपण करण्यात आले.

स्वर्गीय लक्ष्मण ठाकूर यांच्या स्मरणार्थ करण्यात आलेल्या वृक्षारोपणामुळे भविष्यात हे झाड मोठे होऊन लक्ष्मणदादाच्या रूपाने येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना सावली देण्याचे काम करेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.

यावेळी नवपरिवर्तन संस्थेचे नरेश रहालकर, नारायण म्हात्रे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घन:श्याम पाटील, विरेश मोडखरकर, घन:श्याम कडू, रमेश म्हात्रे, दिनेश पाटील, जितेंद्र पाटील, नितेश ठाकूर, प्रज्ञान म्हात्रे, प्रमोद माळी, अजित पाटील, प्रशांत ठाकूर, बॉबी, कुणाल शिसोदिया, आर्यन मोडखरकर आदीं उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.