Press "Enter" to skip to content

जेएनपीटी मध्ये जागतिक पर्यावरण दिन 2021 साजरा

शाश्वत भविष्यासाठी जेएनपीटीचा हरित उपाययोजनांवर भर

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. यांनी बंदर कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची शपथ दिली व त्यानंतर “परिसंस्था पुन:स्थापना” (इकोसिस्टम रिस्टोरेशन) या विषयावरील एक लघु फिल्म दखविण्यात आली.


याप्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री.संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “जेएनपीटी हरित बंदर (ग्रीन पोर्ट) बनण्यासाठी सतत पर्यावरण अनुकूल उपाययोजना करीत आहे. प्रत्येक व्यवसाय/उद्योगाने पर्यावरणासंबंधी आपल्या कर्तव्याप्रति जागरूक असणे अतिशय महत्वाचे आहे. जेएनपीटीला सामाजिक दृष्ट्या एक जागरूक संस्था बनविण्याचे उद्दीष्ट्य प्राप्त करण्यासाठी मी नेहमी आमचे सर्व कर्मचारी व भागधारकांना एकत्र काम करण्यास उद्युक्त व प्रोत्साहित करीत राहतो.”
जागतिक पर्यावरण दिनी हरित व शाश्वत भविष्यासाठी जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. आणि उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान राबविण्यात आली. याप्रसंगी जेएनपीटीच्या विविध विभागांचे अध्यक्ष उपस्थित होते. वृक्षारोपण अभियानामध्ये पिंपळ, कारंज, वड, अशोक, पाम, गुलमोहर व कडुनिंबाची 500 रोपे लावण्यात आली.

जेएनपीटीने आपल्या घनकचरा व्यवस्थापन सुविधा केंद्रामध्ये परिसरातील जसखार, सोनारी, करळ आणि सावरखार येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन जागरूकता प्रशिक्षण आयोजित केले. आयआयटी मद्रासच्या टिमच्या माध्यमातून जेएनपीटी कर्मचारी, टर्मिनल ऑपरेटर आणि टँक फार्म ऑपरेटरसाठी पर्यावरण जागरूकता प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.
जेएनपीटीने सीवेज ट्रीटमेंट प्लांट, टग्स / पोर्ट क्राफ्टसाठी शोर पॉवर सप्लाय, वातावरणीय हवा गुणवत्ता सतत मॉनिटरींग केंद्र, व्यापक घनकचरा व्यवस्थापन सुविधा, ई-आरटीजीसी, ऑईल स्पिल रिस्पॉन्स (ओएसआर) सुविधा, ई-शौचालय, इलेक्ट्रिक वाहने सारख्या विविध पर्यावरण अनुकूल सुधारणा व हरित बंदर उपक्रमांची सुरूवात केली आहे.

जेएनपीटीने आपल्या इमारतींच्या छतावर सुमारे 822 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेलसुद्धा बसविले आहेत. तसेच उर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बंदर क्षेत्रात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. जेएनपीटी पर्यावरणीय, सामाजिक आणि शासकीय (ईएसजी) लक्ष्यांसंबंधी संप्रेषणासाठी ऊर्जा व संसाधन संस्थे (टीईआरआय) मार्फत शाश्वत अभ्यास करीत आहे.

याव्यतिरिक्त, पर्यावरणीय दृष्ट्या बंदरांच्या गुणवत्तेची आणि आरोग्यासंबंधी विविध बाबींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी नियमितपणे चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते.
स्वच्छ व हरित भविष्यासाठी जेएनपीटी आपल्या सर्व सुविधांमध्ये नियमितपणे स्वच्छता कार्य करीत असते. स्वच्छ व शाश्वत बंदर बनवण्यासाठी जेएनपीटीचे प्रयत्न सुरूच राहतील. जेएनपीटीचे उद्दीष्ट आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्याबरोबरच पर्यावरणीय आणि सामाजिक स्थिरता प्राप्त करने देखील आहे. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण हे जेएनपीटीच्या नियोजन आणि कार्याचा अविभाज्य भाग राहील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.