सिटी बेल लाइव्ह / श्रीनिवास काजरेकर/ पनवेल #
‘नाच गं घुमा’ या पनवेल येथील नामांकित संस्थेच्या वतीने महिलांसाठी ऑनलाईन मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्षे 3 ते 18, 19 ते 30, 31 ते 58 व 58 वरील असे वयोगट असून प्रवेश मोफत आहे. पारंपारिक वेशभुषा आवश्यक असून एक-दोघींचे खेळ सादर करायचे अाहेत. यासाठी दोनच मिनिटांची वेळमर्यादा आहे.
नाच गं घुमा ही पनवेलमधील नामांकित संस्था असून .साम टीव्ही, जय महाराष्ट्र, झी, स्टार प्रवाह इ.वाहीन्यांसह 300हून अधिक कार्यक्रम संपन्न झालेले आहेत. झी टिव्हीच्या स्पर्धेत महाराष्ट्रात विजेतेपद या संस्थेने प्राप्त केलेले असून थायलंड येथे कार्यक्रम संपन्न केला आहे.
आपल्या खेळाचा व्हिडिओ बनवून त्यावर आपले नाव व फोन नंबर नमूद करून पुढील व्हॉट्सॅप नंबरवर पाठवावा असे आवाहन संस्थापक संचालिका सुनिता खरे यानी केले आहे. अधिक माहिती व व्हिडिओ पाठवण्यासाठी संपर्क:- मधुरा-9702010341
श्रेया-9833180412






Be First to Comment