सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या रायगड जिल्हयाच्या समन्वयकपदी ग्राहक कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर गरीब, गरजू व आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात १०% खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात मार्गदर्शनासाठी तत्पर असणे.
महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोर गरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ साह्य याकरिता पंतप्रधान वैद्यकीय साहयता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय साहयता निधी व विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास किंवा ठाणे येथील कोपरी मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधून मदत मिळविणे असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.
पक्षाने माझ्यावर जी जबादारी सोपविली आहे, ती यशस्वीपणे पार पाडीत गोर गरीब व गरजूना मदतीचा हातभार देईन असा विश्वास नवनिर्वाचित रायगड जिल्हा समन्वयक रमेश म्हात्रे यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल रमेश म्हात्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment