Press "Enter" to skip to content

प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप यांच्या माध्यमातून रसायनी पोलीसांची अँटिजन तपासणी

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

गेल्या वर्षापासून कोरोना हा आजारांने अनेकांना त्रस्त करून ठेवले आहे.यामुळे प्रत्येकांनी आपली काळजी घ्यावी आणी शासनांने दिलेल्या नियमाचे पालन करावे अशी सुचना आपल्याला मिळत असते. पोलीस,डॉक्टर,शासकीय कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येत असतात.तसेच पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.दिवसभर सातत्याने संपर्कात असल्यामुळे त्यांना ही कोरोनांची लागण होवू शकते.मात्र तसे होवू नये शिवाय झालेला आजार पुढे गंभीर होवू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे यांच्या माध्यमातून रसायनी पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांची कोवीड रॅपिड अँटिजन तपासणी करण्यात आली.

पोलीस कर्मचारी सातत्याने कामात व्यस्त असतात.शिवाय नागरिकांचे समस्या सोडविण्यासाठी जागृत असतात.मात्र कोरोना सारखा आजार सध्या गंभीर असल्यामुळे आज पर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.शिवाय आजही अनेक कोरोना संक्रमित वर उपचार सुरु आहे.मात्र वेळेवर कोरोना सारख्या आजारावर वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे शिवाय या आजारावर दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार गंभीर रुप धारण केले आहे.यातच अनेकांना आपल्याला मृत्यूला कवटाळावे लागले.मात्र तसे होवू नये यासाठी ही कोवीड रॅपिड अँटिजन तपासणी करण्यात आली.

यावेळी रसायनी पोलीस स्टेशन सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.हा आजात गंभीर जरी असला तरी सुद्धा आपण सयंमाने घेवून त्या कोरोना विषयी लढाईचे आहे.या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप यांंच्या माध्यमातून रासायनिक पोलीस स्टेशनंच्या सर्व कर्मचारी यांची ही तपासणी करण्यात आली.यावेळी रसायनी पोलीस निरीक्षक सुजाता तनावडे उपस्थित त्यास समवेत पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.