Press "Enter" to skip to content

मोहोपाड्यात व्यापा-यांची ऍंटीजन चाचणी, सर्वांचा अहवाल निगेटिव्ह

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या पुढाकाराने व लोहोप आरोग्य केंद्राच्या कमिटी अध्यक्षा उमाताई मुंढे व आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने मोहोपाडा प्रवेशद्वार कमानीजवल पोलिस चौकित मोहोपाडा नविन पोसरी परिसरातील १३३ व्यापा-यांची ऍंटीजन चाचणी करण्यात आली.या चाचणीचा अहवाल पाहिला असता सर्वच १३३ व्यापा-यांची ऍंटीजन चाचणी निगेटिव्ह आली आहे.सदर चाचणीत एकही व्यापारी पाॅजिटिव्ह सापडला नाही.

व्यापा-यांची ऍंटीजन चाचणी करण्याप्रसंगी राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती तथा विद्यमान सदस्या उमाताई मुंढे, सरपंच ताईं पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे, उपसरपंच राकेश खारकर,माजी सरपंच संदिप मुंढे,माजी उपसरपंच दत्ता शिंदे, ग्रामविकास अधिकारी सुधीर तोंडलेकर, डॉ.रोकडे, डॉ.किरण पवार,वर्षा पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव अमित शहा आदी उपस्थित होते.

दरम्यान तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्ण सर्वांधिक मोहोपाडा परिसरात दिसून येत असल्याने मृत्यू दरही जास्त आहे.मागील महिन्याभरापासून परिसरातील नागरिकांनी अधिक काळजी घेतल्याने गेल्या बारा-पंधरा दिवसांत कोरोनारुग्णसंख्या खालावली आहे.शिवाय मोहोपाडा नविन पोसरी बाजारपेठेतील व्यापा-यांनी आपल्या दुकानाबाहेर मास्क शिवाय दुकानात येवू नये,दुकानापासून दोन मिटरवर उभे राहावे तसेच दुकानाबाहेर गोल रिंगण केल्याने सोशल डिस्टिंक्शनचे पालन होताना दिसत असल्याने नागरिक आणि दुकानदार यांत अंतर ठेवूनच खरेदी विक्री होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.