रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याच्या केल्या सूचना
पुरेसे मनुष्य बळ ,डॉक्टर आणि नर्स ची सुविधा पुरविल्यास 450 बेडच्या खाजगी रायगड हॉस्पिटलला कोविड उपचार केंद्र म्हणून मान्यता देणार — जिल्हाधिकारी
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
कर्जत तालुक्यातील वाढती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि कोविड केअर सेंटर मध्ये मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबतच्या वाढत्या तक्रारी याची दखल घेत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालय रायगड कोविड केअर सेंटर ची पाहणी करत रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या तसेच ऑक्सिजन बेडची सुविधा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल हे कोव्हीड सेंटर म्हणून शासनाने ताब्यात घेतले आहे, 450 बेड असलेल्या या हॉस्पिटल मधील 100 बेड हे शासकीय कोव्हीड सेंटर म्हणून शासनानाने ताब्यात घेतले आहे, उरलेल्या 350 बेड वर रायगड हॉस्पिटल स्वतःचे हॉस्पिटल चालवत आहे, मात्र शासनाने 100 बेड ताब्यात घेवून सुरू केलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये कोणतीच सुविधा मिळत नाही अशी तक्रार अनेकांनी केली होती
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम रायगड हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ची पाहणी केली. तेथे असलेल्या सुविधांबाबत आढावा घेतला . तसेच हे हॉस्पिटल सद्या फक्त कोविड केअर सेंटर आहे. येथे काही प्रमाणात ऑक्सिजनची सुविधा आहे .मात्र हे हॉस्पिटल मोठे असल्याने तसेच डॉक्टर ,परिचारिका आणि मनुष्यबळ पुरेसे असल्यास आणि ऑक्सिजनची सुविधा दिल्यास येथे 450 खाटांचे कोविड उपचार केंद्र बनविणे शक्य होईल आणि तसे झाल्यास या खाजगी हॉस्पिटलला कोविड उपचार केंद्रांची मान्यता देऊ असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख ,कर्जत उपजिल्हा रुग्णालय डॉ . मनोज बनसोडे , गटविकास अधिकारी बालाजी पुरी आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता .
रायगड हॉस्पिटलमध्ये 450 बेडची सोय करून तेथे ऑक्सिजनची सुविधा आणि पुरेसे डॉक्टर ,नर्स ,मनुष्यबळाची सोय केल्यास खाजगी कोविड उपचार केंद्र म्हणून मान्यता देऊ . ज्यामुळे कर्जत मधील रुग्णांना अन्य मोठ्या शहरात उपचारासाठी पाठविण्याची गरज पडणार नाही .






Be First to Comment