पत्रकार, पोलीस व इतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कोरोना लस द्या
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाकडून कसोशीने प्रयत्न आहेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहेत. तरी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या सर्वांच्या कुटुंबाला लसीकरण करण्यात यावे अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शासनाने लसीकरण सुरू केले आहे. परंतु जीवावर उदार होऊन वृत्त संकलन करणारे पत्रकार, पोलीस व इतर शासकीय कर्मचारी यांना लस देण्यात येते. परंतु त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला लस ही देण्यात यावी.
तरी शासनाने जीवावर उदार होऊन काम करणारे पत्रकार, पोलीस व इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना काम करीत असताना कुटुंबातील एखाद्याला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सारासार विचार करून त्यांच्या सर्व कुटुंबाला मोफत लसीकरण करण्यात यावे यासाठी ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे.







Be First to Comment