सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
उरण आगारात आपलं सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्रातील लाल परीचा 73 वर्धापनदिन साजरा करण्यात आला अहमदनगर ते पुणे ही भाग्यवान शहरे ज्यांच्या दरम्यान पहिली एस टी एक जून 1948 रोजी रस्त्यावर धावली या दिनाच्या निमित्ताने राज्य परिवहन उरण आगारात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली यावेळी आगाराचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. आगार प्रमुख सतीश मालचे यांनी लाल परीचे पूजन करून बस स्थानकावरील प्रवाशांना प्रसाद म्हणून साखर वाटप करण्यात आले.

या वेळी आगार व्यवस्थापक सतिश मालचे, स्थानक प्रमुख एम .सी .भुंडे, पाली प्रमुख डी .पी .तारेकर, ए .डब्लू .एस, मंगेश मुकादम, वाहतूक नियंत्रक अशोक कोळी आदी सह चालक, वाहक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते








Be First to Comment