सिटी बेल । उरण । प्रतिनिधी ।
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त प्रांजल कडू हिने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्केच काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. हे काढलेले स्केच बघून अनेकांनी प्रांजलचे अभिनंदन केले आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा २ जून हा वाढदिवस असतो. या वर्षी ७० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने साजरा केला जात आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मानणारा लोकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनेकांनी विविध कार्यक्रमाद्वारे साजरा केला. १० वीत शिकणाऱ्या प्रांजल घन:श्याम कडू हिने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे छायाचित्राचे स्केच काढून आपल्या परीने शुभेच्छा देण्याचा छोटासा प्रयत्न केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रांजल कडू हिने काढलेल्या छायाचित्राचे स्केच व्हाट्सएप व फेसबुकवर व्हायरल करताच अनेकांनी प्रांजल कडू चे अभिनंदन करून तिला प्रोत्साहन देण्याचे काम केले.








Be First to Comment