सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोमनादेवी ऑक्सिजन पार्कचा चेहरामोहरा बदलून निसर्गरम्य असे पर्यटनस्थळ बनण्याच्या दिशेने आगेकूच होत आहे. यासाठी त्यांना अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. निवास गावंड सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था केली आहे.
वाढदिवस कसे साजरे करावे याच उत्तम उदाहरण म्हणजे निवास गावंड सर आपल्या वाढदिवसाच्या निमित्य लोक पार्टी, एक नाही तर पाच सहा केक,चागल्या धाब्यावर जेवण आणि इतर सर्व गोष्टी हे नव्याने सांगायची गरज नाही, शेवटी खूप काही परंतु निवास गावंड सरांचे वाढदिवस मात्र जरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
अल्पशा मानधनावर काम करणारा हा शिक्षक परंतु समाज्यासाठी आपल्या परीनं जे काही करता येईल ते प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करीत आहे.

या अगोदरच अनेक उपक्रम दत्तक पालक योजना असेल किंवा आदिवासी वाडीवर कपडे वाटप असेल किंवा वाढदिवसाचे विविध संकल्प असतील याही वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे बसण्याची आसन व्यवस्था व्हावी असा संकल्प त्यांनी केला. तो पूर्ण करून एक सुंदर बेंच कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये बसविण्यात आला.
यासाठी सारडे विकास मंचचे रोहित पाटील, विलास पाटील सर, प्रसाद पाटील, नितीन म्हात्रे, कांतीलाल म्हात्रे, निलेश म्हात्रे, प्रतीश म्हात्रे, नितेश पाटील, वैभव पाटील, अमर पाटील, रचित या सर्वांच मोलाचं सहकार्य लाभले.








Be First to Comment