सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाने लसीकरणाची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यावर गर्दी होत असल्याने उरणमध्ये खासगी लसीकरणास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परवानगी दिली आहे. उरणमधील पालवी हॉस्पिटल, मोरे हॉस्पिटल व ठाकरे हॉस्पिटल अशा ३ हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली आहे.

काल पासून या लसीकरणास सुरुवात झाली आहे. उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनच्या मदतीने ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. काल एकूण ६५० जणांनी लसीकरण करून घेतले. लवकरच या तिन्ही ठिकाणी लसीकरणास सुरुवात होणार आहे.
तरी ज्यांना कोणाला लसीकरण करावयाचे असेल त्यांनी पालवी हॉस्पिटल ९८९२५१५५११, मोरे हॉस्पिटल ९८२१३१८५२३ व ठाकरे हॉस्पिटल ९८३३४५४१९८ या ठिकाणी संपर्क करून नोंदणी करून घेण्याचे आवाहन वरील हॉस्पिटलने केले आहे.








Be First to Comment