सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।
मंगळवार दिनांक ०१ जून २०२१ रोजी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांचा वाढदिवस साजरा न करता शिवसेना उरण तालुका व उरण शहर यांच्यावतीने उरण शहरात व तालुक्यामध्ये विविध समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रथम उरण शहर शाखेमध्ये छत्रपती शिवाजी महराज, मा.बाळासाहेब ठाकरे, व मॉ.साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उरण पोलीस स्टेशन व मोरा पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचार्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर चक्रीवादळामुळे मांगीरा-भवरा येथील अपघातग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

तसेच उरण तालुक्यातील कोव्हीड सेंटर येथे ऑक्सिजन मास्क व व्हॅकूम क्लिनर डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. या मास्कच्या वापरामुळे ज्या रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल कमी आहे त्यांची ऑक्सिजन लेव्हल रिकव्हर करण्यासाठी याचा वापर केला जाईल.

तद्नंतर उरण कोव्हीड सेंटर सभोवतालच्या परीसरामध्ये ऑक्सिजनपूरक वृक्ष लागवड करण्यात आली. द्रोणागिरी नोड येथे बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षक सेनेच्या वतीने सी.एम. निधी साठी 50, 000 रु. धनादेश सुपूर्द करण्यात आला. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी अपंग बांधवांसाठी केलेल्या विविध कार्यामुळे अपंग संघटनेचे राजेश भोईर व त्यांचे सहकारी सदस्य यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.विभागप्रमुख संदेश पाटील यांच्याकडून मास्क व सॅनिटायजर देण्यात आले.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण शहरातील मोहल्ला विभागातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख जे.पी. म्हात्रे, गटनेते गणेश शिंदे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, मा.सभापती भास्कर मोकल, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुकासंघटक के.एम.घरत, कामगार नेते महादेव घरत, ग्रा.सं.कक्ष रमेश म्हात्रे, विभागप्रमुख एस.के.पुरो, विभागप्रमुख संदेश पाटील, व्यापारी अ. अध्यक्ष द्रोणागिरी रविंद्र पाटील, मा.नगरसेवक निलेश भोईर, अवजड शहरप्रमुख चेतन म्हात्रे, शहरयुवाअधिकारी नयन भोईर, युवासेना अधिकारी द्रो.नोड करण पाटील, मा.सरपंच जगजीवन नाईक, ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकूर, नगरसेवक समीर मुकरी, उपशहरप्रमुख गणेश पाटील, कामगार नेते गणेश घरत, युवासेना अधिकारी निशांत घरत, शिक्षकसेना नरेश मोकाशी, शिक्षकसेना कौशिक ठाकूर, शिक्षकसेना हितेंद्र म्हात्रे, शिक्षकसेना महेश गावंड, महिला आघाडी सुजाता गायकवाड, नगरसेविका वर्षा पाठारे, महिला आघाडी विना तनरेजा, रजिया शेख, कुरेशी अन्वर, एजाज मुकादम, धिरज बुंदे, विकी म्हात्रे, संजय गावंड, डॉमनिक कोळी, प्रदिप शेळके, संदिप पाटील, युवासेना अश्फाक, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, शाखाप्रमुख शैलेश भोईर, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, शाखाप्रमुख सचिन पाटील, शाखाप्रमुख राकेश तांडेल, सचिन ठाकूर, संदिप जाधव, इस्माईल शेख, कोव्हीड सेंटर मधील सर्व डॉक्टर कर्मचारी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.









Be First to Comment