सिटी बेल लाइव्ह / माणगांव /प्रतिनीधी.
माणगांव रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध तालुक्याचे ठिकाण व जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे शहरातुन दिघी पुणे महामार्ग व मुंबई गाेवा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहराच्या साैदर्यात व व्यावसायिक उत्पन्नात महत्वपुर्ण भर पडत असते पण मागील दाेन वर्षापासुन माणगांव शहरात दिघी पुणे महामार्गावर रेल्वे क्राँसिंग ब्रीज आहे या ब्रीज खालुनच पुणे दिघी महामार्ग म्हणजेच माणगांवकरांचा निजामपुर राेड आहे या ब्रीज खाली सदासर्वकाळ सांडपाणी साठलेले असते विषेश म्हणजे रस्त्याच्या दाेन्ही बाजुला गटारे आहेत मात्र डाव्या बाजुचे गटार अतिक्रमणामध्ये अर्धवट बुजवुन टाकलेले असल्याने गटारातील सांडपाणी सदानित्य रस्त्यावर तुंबुन राहत आहे यामुळे आता पावसाळा असल्याने व रस्ता सिमेंट काँक्रीट असल्याने सद्यस्थितीत शेवाळाचे साम्राज्य निर्माण झाले आहे व सांडपाण्याची दुर्गंधी ही तितकीच पसरली आहे.यामुळे पादाचारी व वाहनांना त्रास तसेच दुचाकी तीन चाकी अपघातांची दाट शक्यता आहे साेबतच काेराेनासाेबतच इतर राेगराई ह्या सांडपाण्यामुळे पसरण्याची दाट शक्यता आहे.या करिता सदर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याने,राष्ट्रीय महामार्ग विभागाने गटारांवर अतिक्रमणाकडे व सांडपाण्याच्या याेग्य निचरा हाेत नसल्याने जबाबदारी म्हणुन माणगांव नगरपंचायतीने लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी माणगांव तालुक्यातील संतप्त नागरिकांकडुन हाेत आहे.






Be First to Comment