सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
मोहोपाडा बाजारपेठेतील श्रीदत्त मंदिराजवळ एका तरूण युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याने परीसरात खलबल माजली आहे.हल्ला करणा-या आरोपींना जेरबंद करण्यात रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश चंद्रकात चव्हाण (वय 29 वर्ष) ,रा.सुनित सिध्देष बिल्डींगसमोर ,टीसीआय एक्सप्रेस ,रिस येथे राहणारा असून निलेश चव्हाण आणि करण मारूती जाधव हे स्कुटी ( एम एच 46 बीवाय -1001) मोहोपाडा येथे घरगुती सामान आणण्यासाठी गावातील रत्स्त्याकडून मोहोपाड्याकडे दत्त मंदीराजवळ आला असताना गाडीच्यासमोर अचानक सुरज रघुनाथ पाटील रा.मोहोपाडा , ता.खालापुर व त्याच्यासमवेत योगेश पाटील , मंदार पाटील , देविदास काठवळे , रोहीदास काठवळे , धनाजी कतारे हे आडवे आले.त्या सर्वाच्या हातात लाकडी दांडके होती.
यावेळी सुरज पाटीलने शिविगाल करत मलाच मारून माझे घरासमोरून जातोस का? असे म्हणाला व त्याच्यासमवेत असलेल्या मुलांना मारण्यास सांगितले. यावेळी सुरज व त्यांच्या साथीदारांनी दांडक्याने मारहाण करण्यास सुरवात केली .त्यावेळी निलेश चव्हाण व करण जाधव गाडीवरून खाली पडले.यावेली सुरज पाटील व त्याचे साथीदार मारणार हे निलेशच्या लक्षात आल्यावर तो बाजारपेठेकडे धावत गेला.
यावेळी सुरज पाटील व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून दत्त मंदीराजवळ सुरज पाटील याने निलेशच्या डोक्यात काहीतरी जोरात मारले.तेव्हा निलेश जमिनीवर पडला.यावेली नागरिकांनी निलेशला पल्स हाॅस्पीटल मोहोपाडा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.नंतर चौक रूग्णालयात नेले तेव्हा करण जाधवसोबत अजित भोईर होता .नंतर पनवेलला नेले तेव्हा निलेशसोबत त्याचे भावजी अविनाश नारायण जाधव व मित्र समाधान म्हात्रे हे दोघे होते.निलेशचे सिटीस्कन करुन नंतर पुन्हा मोहोपाडा येथील आयुष हाॅस्पीटलमध्ये आणले.
सन २०२० एप्रिल महिन्यातील हा रागाचा सूड घेण्याचा प्रयत्न सुरज व त्यांच्या साथीदारांनी केला अशी चर्चा नागरिकांत सुरू असून रसायनी पोलिस ठाण्यात नोंदही आहे.याबाबत निलेश चव्हाण यांनी रसायनी पोलिसांत तक्रार दिली असून रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.याप्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० ३०७ 2 ,भारतीय दंड संहिता १८६० ३२४ 3, भारतीय दंड संहिता १८६० ३४१ 4 ,भारतीय दंड संहिता १८६० १४३ ,भारतीय दंड संहिता १८६० १४४ 6 ,भारतीय दंड संहिता १८६० १४७ 7 ,भारतीय दंड संहिता १८६० १४८ 8 ,भारतीय दंड संहिता १८६० १४ ९ ,भारतीय दंड संहिता १८६० १८८ 10, भारतीय दंड संहिता १८६० २६ ९ 11, भारतीय दंड संहिता १८६० २७० 12 ,भारतीय दंड संहिता १८६० ५०४ 3. ( a ) नुसार गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास रसायनी पोलिस करत आहेत.







Be First to Comment