सिटी बेल । क्राइम अपडेट । संजय कदम ।
राहत्या घरातून दागिन्यांची चोरी
राहत्या घरातील बेडवर ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.
कामोठे वसाहतीमध्ये राहणार्या भाविका चित्रोडा यांनी त्यांना मुळगावी जायचे असल्याने काही कपड्यांसह सोन्याचे दागिने ज्याची किंमत जवळपास 45 हजार रुपये इतकी आहे हे घरातील बेडवर बॅगेत भरण्यासाठी ठेवले असता सदर दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दुचाकीची चोरी
बिल्डिंगच्या पार्किंगमधून 90 हजार रुपयांच्या दुचाकीची चोरट्यांनी चोरी केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाईन आळी येथे राहणारे अनिल दगडू भालेराव यांच्या मुलाने श्रेया वल्लभ बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये दुचाकी एमएच 46 बीटी 7548 पार्क केली होती. चोरट्याने या गाडीची चोरी केली आहे.
कपाटातील रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी
दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली आहे. खारघर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीआयएसएफ येथे निरीक्षक पदावर काम करणारे अविनाश अमर हे खारघर सेक्टर 35 डी येथे राहतात. ते मुंबई येथे कामासाठी गेले होते. कामावरून परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या दरवाज्याचा लॉक तूटलेला दिसला. यावेळी चोरट्यांनी 35 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल आणि पाच हजार रुपये चोरून नेले.








Be First to Comment