सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील नेरळ चे सुपुत्र जागतिक विक्रमवीर ॲड. गजानन डुकरे यांनी तर जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे, मात्र नुकताच त्यांचा सुपुत्र कु.देवराज गजानन डुकरे यांनी देखील जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे त्यामुळे निर्णय शहरातील डुकरे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे कुमार देवराज गजानन डुकरे याचे वय 16 वर्षापेक्षा कमी असल्याने त्याची वर्ल्ड ग्रिनीच बुकात नोंद होणार आहे मात्र खुद्द राज्याचे वय 8 वर्ष असल्याने त्याची संधी हुकली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथे डुकरे कुटुंबीय राहत आहे, या कुटुंबातील ॲड.गजानन डुकरे यांनी 2 तास 48 मिनिटात नॅशनल फ्लॅग सायकलला लावून सायकल ने 72 किलोमीटर प्रवास केला आहे, त्यामुळे ॲड.गजानन डुकरे यांच्या या प्रवासाची नोंद जागतिक विक्रम म्हणून करण्यात आली होती, त्यावेळेस सर्व स्तरातून डुकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला होता, त्यानंतर पुन्हा डुकरे कुटुंबियातील ॲड.गजानन डुकरे यांच्या मुलाने विश्व विक्रम नोंदविला आहे. कु.देवराज गजानन डुकरे (वय 8) याने नुकताच 30 सेकंदात 63 उड्या मारून जागतिक विक्रम नोंदविला आहे, यापूर्वी 30 सेकंद 56 उड्या मारण्याचा विक्रम देवराज याने मोडला असून त्याने तीस सेकंदात 63 उड्या मारल्या आहेत, जम्पिंग जॅक्शनने हा विक्रम नोंदवला आहे त्यामुळे 30 सेकंदात 63 उड्या मारणारा देवराज त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, त्याचा या जागतिक विक्रमाने देवराज चे आई-वडील तसेच त्यांचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत.
दरम्यान गिनीज बुकात यापूर्वी 1 मिनिटात 123 उड्या मारल्या गेल्याची नोंद आहे, मात्र कु. देवराज गजानन डुकरे हा 1 मिनिटात 124 उड्या मारतो, गिनीज बुकात नोंद होण्यासाठी वयाची अट 16 वर्षाच्या वर आहे तर कु. देवराज गजानन डुकरे हा वयाने लहान म्हणजेच 8 वर्षाचा आहे, त्यामुळे त्याची गिनीज बुकमध्ये नोंद होत नसल्याची माहिती देवराज याचे वडील ॲड. गजानन डुकरे यांनी दिली आहे. मात्र 30 सेकंदात 63 उड्या मारणार्या कु.देवराज वर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून त्याचे आई-वडिलांचे व कुटुंबीयांचे या विश्वविक्रमाने सर्वत्र अभिनंदन होत आहे.








Be First to Comment