महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालुका उरणतर्फे मुख्यमंत्री साह्यता फंडास 53 हजारांची मदत
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोव्हिड 19 महारोगाशी लढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उरण तालुकातर्फे मुख्यमंत्री साह्यता फंडास 53 हजारांची मदत निधीचा धनादेश माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
ह्या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेशजी रहाळकर, तालुकाप्रमुख, संतोष ठाकूर, उरण शहर संपर्क प्रमुख गणेशजी म्हात्रे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, पं.स. सदस्य हिराजी घरत, द्रोणागिरी स्पोर्ट्सचे संस्थापक व अध्यक्ष महादेव घरत, शिक्षक सेनेचे कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर, रायगड जिल्हा सरचिटणीस हितेंद्र म्हात्रे, शिक्षकसेनेचे सल्लागार महेश गावंड, पनवेल तालुका अध्यक्ष चंद्रकांत कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय होळकर, खजिनदार श्री दिलीप म्हात्रे उपस्थित होते.
गेल्या वर्षा पासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे.आपला महाराष्ट्र देखील कोरोनाच्या छायेत आहे.शिक्षक सेना ही शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्या बरोबर नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते. ह्या जाणिवेतूनच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उरण संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वेच्छेने आर्थिक मदत करण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले. त्यास अनेक शिक्षक बंधू भगिनींनी सामाजिक बांधिलकी जपत ५३ हजारांचे आर्थिक सहकार्य केले आहे.








Be First to Comment