सिटी बेल लाइव्ह /मुरूड /अमूलकुमार जैन #
मार्च महिन्यापासून सुरू झालेला करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार मंजूर केलेली प्रस्तावित कामे करता आली नाहीत, ती कामे आता मार्गी लागणार आहेत. आता निसर्गाची मेहरबानी आणि प्रशासनाचे करोना सोबत आपला दिनक्रम सुरू करण्याचे धोरण यानुसार खोळंबलेल्या कामाला पुन्हा गती मिळणार आहे. सर्व जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे. करोना कार्यवाही आणि विकास कामे यासंदर्भातील प्रशासनाच्या भूमिकेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पक्क्या रस्त्यांची रखडलेली कामे पावसाळ्यानंतर सुरू होतील. परंतु पालिका नियोजनानुसार ठरल्याप्रमाणे खड्ड्यांच्या संदर्भातील कामे पावसाची उघडीप पडल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये सुरू होतील.
आशी माहिती मुरूडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भव कमी करण्यासाठी मुरूड नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र काम करीत आहेत.कोरोना’ विषाणूचा संसर्ग सर्व जगभर पसरू लागल्याने त्या भितीने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी शासकीय दवाखान्यात जाण बंद केल्यामुळे गरीब रूग्णाचे हाल होवू नये त्यासाठी बाजारपेठेतील शासकीय दवाखान्यात ओपडी संदर्भात स्थानिक डाॅक्टराची मिटींग घेण्यात आली.
अचानक पणे निसर्गचक्रीवादळाचा फटका तालुका सह शहराला बसुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसान भरपाई ताबडतोब मिळावी करिता शासनाने पंचनामाकरिता नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी अधिकारी नेमले हे नेमल्यानेच शहरातील पंचनामा जलगतीने होवु शकले आणि नूकसान ग्रस्तांना भरपाई मिळण्यास सुरवात झाली. नगरपरिषदेचे कर्मचारी अधिकारी कडून मी सतत कामाचा आढावा घेत आहे प्रशासन उत्तम पणे चागंल काम चालू आहे ते करीत आहेत.चांगल काम करून सुध्दा नगरपरिषदेच्या कारभारावर टिका करीत आहेत.कोरोनाच्या लाॅकाडाऊन मुळे कामाला गती कमी मिळाली आहे. रखडलेल्या कामा संदर्भात आपल्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडीत याच्याकडे पाठपुरवा मी स्वत:हा करीत आहे.
मुरूड हद्दीतील खड्डे बुजवण्याच ठेका वसुंधरा डेव्हलपर्स यांना ९लाख ३० हजार १७५ रूपये ऐवढा किमतीत २२मे २०२० रोजी प्रतिक नितिन आबुर्ले याना देण्यात आला होता.परंतु शहरातील खड्डे बुजवण्यास असमर्थ राहिल्याने आता आपल्या नगरपरिषद कर्मचारी तर्फे पावसाचा ओक कमी झाल्या झाला रस्तावरचे खड्डे तातडीने डाबर खड्डी टाकुन बुजविण्यात येतील आणि नव्याने मंजुर झालेल्या रस्ताची कामे पावसाळा नंतर कामाला सुरवात होणार आहे तरी शहरातील नागरिकांनी या संदर्भात सहकार्य करावे.
निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर जास्तीत जास्त रक्कम मिळावी याकरिता पालकमंत्री , आमदार , कृषीमंत्री यांना निवेदन आपल्या नगरपरिषद तर्फे निवेदन देवुन सतत पाठपुरवा करित आहेत.तसेच वीज बील माफ होण्याकरिता ही सतत पाठपुरवाकरित आहोत.
चक्री वादळामुळे शहरातील गावदेवी पाखाडी येथील स्मशानभूमी शेडचे छपर उडाले होते. त्या कामाला ही सुरवात झाली आहे. उर्वरीत रखडलेल्या कामाला लवकारात लवकर सूरूवात होईल. नगरपरिषद प्रशासन आपल्या परिहीने काम करित आहेत.आशी माहिती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी केले.






Be First to Comment